Pune Crime | कोंढव्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सासरी होणार्‍या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधाराणी संदीप वाघे (वय २४, रा. आशियाना ड्रीम, कोंढवा) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सिद्धलिंग सिद्राम कुसनेरे (वय १९, रा. नागराह, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ८७३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती संदीप नामदेव वाघे, सासु शकुंतला वाघे, यशोदा राहुल लिंबाचे (सर्व रा. आशियाना ड्रीम, कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना २८ मार्च ते २६  ऑगस्ट २०२२ दरम्यान घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण सुधाराणी तिचा संदीप वाघे याच्याबरोबर विवाह झाला.
विवाहानंतर तिचा संदीप व इतरांनी वारंवार शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
या छळाला कंटाळून सुधाराणी हिने २६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title : –  Pune Crime | Married woman commits suicide by hanging herself in Kondhwa A case has been registered against the three including the husband

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा