Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अल्ताफ शेख व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 101 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंबई-पुणे रस्त्यावरील (Mumbai-Pune Road) पाटील इस्टेट (Patil Estate) भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA Action) Mokka कारवाई करण्याचे (Pune Crime) आदेश दिले.

 

टोळी प्रमुख अल्ताफ मोहम्मद शेख Altaf Mohammad Shaikh (वय 20), तौसिफ उर्फ अमन दस्तगीर शेख (वय 22), अदिल जावेद शेख (वय 19), आसिफ शेरू शेख (वय 18), गफूर जिलानी सय्यद (सर्व रा. पाटील इस्टेट, वाकडेवाडी-Wakdewadi, मुंबई-पुणे रस्ता) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अल्ताफ शेख आणि साथीदारांनी पाटील इस्टेट भागात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न (Attempted murder), जबरी चोरी (Theft), सदोष मनुष्यवध, खंडणी (Extortion) मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

खडकी पोलीस ठाण्याचे (Khadki Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane),
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम (PSI Vaibhav Magdoom), आर. के. जाधव, विकास घायतडक
यांनी अल्ताफ शेख टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. गेल्या दीड वर्षात शहरातील 101 गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | ‘Mokka’, Commissioner Amitabh Gupta’s 101st action till date against Pune’s Sarait criminal Altaf Shaikh and his gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार