Pune Crime | डोक्यात सपासप वार करून गारवा बिर्याणीच्या मॅनेजरचा खून, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असलेल्या गारवा बिर्याणीच्या (Garva Biryani) मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्यांचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही. (Pune Crime)

 

भरत भगवान कदम Bharat Bhagwan Kadam (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी – Dhayari) असे खून झालेल्याचे नाव आहे.

 

याप्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकामे प्लॉट येथे हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले. कोणत्यातरी हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले. त्यात ते तेथेच जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. याची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले. तेथेच त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी मिळून आली. तसेच त्यांच्या खिशातील पैसे, पाकिट व अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरत कदम यांच्या खुनामागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

Web Title :- Pune Crime | Murder Case Garva Biryani Manager Sinhagad Road Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kantara Movie | “हा चित्रपट अतिशय खराब…” ‘कांतारा’वर ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची टीका

Shehnaaz Gill | परदेशात जाऊनही शहनाज गिलने जपली भारतीय संस्कृती, ‘त्या’ कृतीचे होत आहे सर्वत्र कौतुक

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी फोन फिरवत नंदुरबारला दिले 7 कोटी