Pune Crime | पुण्यात दत्तवाडीमध्ये तरुणाचा चाकूने भोसकून खून; तिघा संशयितांना घेतले ताब्यात

पुणे : Pune Crime | पूर्ववैमनस्यातून दत्तवाडीमध्ये पहाटे एका तरुणाचा चाकूने भोसकून खून ( Murder of Youth in Dattawadi) करण्याचा आल्याने एकच खळबळ उडाली (Pune Crime) आहे.

मंदार जोगदंड (वय २३, रा़ दांडेकर पूल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत एका आठवड्यात सलग हा दुसरा खूनाचा (Pune Crime) प्रकार घडला आहे. ही घटना नवशा मारुती मंदिराजवळील सई हेरिटेजसमोर पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. या खून प्रकरणी त्यांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे.

हडपसरमध्ये रिक्षाचालकाचा खून

पुणे शहरात पहाटेच्या सुमारास एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे.

हडपसर येथील सोलापूर रोडवरील चौकात एका रिक्षाचालकाच्या (Murder of Auto Rickshaw Driver in Hadapsar) गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार पहाटे ६ वाजता उघडकीस (Pune Crime) आला.

प्रदीप शिवाजी गवळी Pradeep Shivaji Gawali (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पंधरा चौकात प्रदीप गवळी याचा मृतदेह पडला असल्याची माहिती नागरिकांनी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली.
त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे (Hadapsar Police Station) पोलीस निरीक्षक राजू अडागळे (Police Inspector Raju Adagale) यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.
प्रदीप गवळी याच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला आहे.

प्रदीप गवळी हे रिक्षाचालक असून खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गवळी यांचा कोणाशी वाद होता का, ही घटना घडताना कोणी पाहिले का याची पोलीस चौकशी करीत  आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | हडपसरचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदमांची उचलबांगडी ! अवैध धंद्यांमुळं कारवाई? ‘त्या’ कर्मचार्‍यांमुळे वरिष्ठ ‘गोत्यात’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Murder of Youth in dattawadi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update