Pune Crime News | जादा परताव्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक; प्रमोद देसाई गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर फर्मच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | प्रमोद देसाई गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर फर्ममध्ये (Pramod Desai Government Register Contractor Firm) गुंतवणूक (Investment) केल्यास २४ टक्के वार्षिक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची दीड कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत कल्याणीनगरमधील एका 49 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोरस प्रमोद देसाई (Porus Pramod Desai), प्रमोद यशवंत देसाई (Pramod Yashwant Desai), जयश्री प्रमोद देसाई (Jayshree Pramod Desai), स्रेहा प्रमोद देसाई (Sreha Pramod Desai), ऐश्वर्या पोरस देसाई Aishwarya Porus Desai (सर्व रा. राजश्री शाहु सोसायटी, सातारा रोड, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद देसाई हे गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहेत. सिमेंट ब्रिक्स, ग्रिल आदी वस्तूचा पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. प्रमोद देसाई यांनी फिर्यादी यांना त्यांच्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास प्रथम १९ टक्के नंतर २४ टक्के वार्षिक परतावा देण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार फिर्यादी यांनी वेळोवेळी ९० लाख रुपयांची गुंतवणुक केली. त्याबाबत करारनामा करण्यात आला.
त्यावर त्यांनी वेळोवेळी ५४ लाख रुपये परत केले. त्यानंतर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली.
फिर्यादीची मुळ रक्कम व त्यावरील परतावा असे एकूण ३५ लाख ६० हजार रुपये तसेच गॅग्रीमेट
प्रमाणे दंड ३३ लाख रुपये अशी एकूण १ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये परत न करता फसवणूक (Fraud) केली.
सहायक पोलीस निरीक्षक आळेकर (Assistant Police Inspector Alekar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बॅड टचला विरोध केल्याने बापाने गरम इस्त्रीचा मुलीच्या गालाला दिला चटका