Pune Crime News | किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | किराणा मालाचे होलसेल विक्रेत्याकडून (Grocery Wholesaler) 10 लाख रुपयांचा माल उधारीवर घेऊन त्याची विक्री करून ही उधारी न चुकवता फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मे 2019 ते 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी चेतन बाबुशेठ चौधरी Chetan Babusheth Chaudhary (वय-26 रा. श्री पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन भागीरथ शेषाराम चौधरी Bhagirath Sesharam Chaudhary (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी चेतन चौधरी यांचे मांजरी बुद्रुक येथील बेल्हेकर वस्ती येथे आशापुरा ट्रेडर्स
नावाचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. तर आरोपीचे मांजरी परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे.
आरोपीने फिर्यादी यांच्या सोबत ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी यांच्याकडून 9 लाख 91
हजार 684 रुपयांचा किराणा माल उधारीवर विक्रीसाठी नेला. मात्र, आरोपीने मालाचे पैसे न देता फिर्यादी यांची
आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे (API Dabhade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Disha Patani Gorgeous Look | इवेंटमध्ये दिशा पटानीने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…!