Pune Crime News | ऑस्ट्रेलियातील हॉटेलमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची २ कोटींची फसवणूक; नागपूरमधील दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑस्ट्रेलिया येथील कंपनी मार्फत व्हिसा काढून देऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना बनावट ऑफर लेटर (Fake Offer Letter) देऊन त्यांची तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम ऊर्फ सॅम जोशी (रा. ऑस्ट्रेलिया) आणि दिपिका कामदार (रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ताडीवाला रोड येथील न्यू एडियु व्हिजन कन्सलटन्सी येथे जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोड येथील हेरीटेज अपार्टमेंटमध्ये न्यु एडियु व्हिजन कन्सलटन्सी ही कंपनी आहे.
फिर्यादी यांच्या कंपनीतील इच्छुक अर्जदार यांना त्यांचे ऑस्ट्रेलिया स्किल व्हिसा प्रा. लि. (Australia Skill Visa Pvt. Ltd.) या कंपनीमार्फत व्हिसा काढून देऊन नोकरी देणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांना ऑस्ट्रेलिया येथील नामांकित हॉटेलचे बनावट ऑफर लेटर दिले.
ऑफर लेटर पाहून फिर्यादी व त्यांच्या कंपनीतील इतर अर्जदारांनी व्हिसा व अन्य कामासाठी त्यांना २ कोटी ३८ लाख १८ हजार रुपये पाठविले.
त्यानंतर आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्यादी दिली असून पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

 

Web Title : – Pune Crime News | 2 Crore fraud of youth by luring them of jobs in hotels in Australia; A case has been registered against two people in Nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना