Pune Crime News | बाणेर परिसरातील बंगल्याची परस्पर विक्री करून 21 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | करारनामा करुन दिलेल्या बंगल्याची परस्पर विक्री करुन 21 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार बाणेर येथे घडला आहे. याप्रकरणी जयदेवन एम व्ही नायर (Jayadevan MV Nair) व श्रीजीत नायर Shrijit Nair (दोघे रा. बाणेर रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नेहा हेमंत प्रधान (वय-28 रा. कात्रज) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिल व आजीचे निधन झाले आहे. निधनापूर्वी बाणेर रोड येथील प्रॉपर्टी संदर्भात आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांसोबत एप्रिल 2019 मध्ये समजुतीचा करारनामा केला होता. दरम्यान, फिर्यादी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी बंगला खरेदी बाबत आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना दिलेले 33 लाख रुपये परत मागितले. (Pune Crime News)

वारंवार पैशांची मागणी करुन देखील आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान नायर यांनी फिर्यादी यांच्या
परस्पर बंगल्याची दुसऱ्याला विक्री केली. फिर्यादी यांनी नायर यांच्याकडे 33 लाख रुपये परत देण्यासाठी तगादा
लावला असता 12 लाख रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी यांना उरलेले 21 लाख रुपये देणार नसल्याचे सांगून त्यांना
नोटीस पाठवली. आरोपींनी फिर्य़ादी व त्यांच्या वडिलांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत
म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप

IT Raid In Pune | पुण्यातील निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर आयकर विभागाचे छापे

Drug Mafia Lalit Patil | ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे देऊन मॅनेज केलं, ललित पाटीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर