जनता वसाहत येथील कॅनोलमध्ये तरुण बुडाला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   जनता वसाहत येथील कॅनोलमध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचे सांगण्यात आले. रविवारी त्याचा मृतदेह आढळला.

अक्षय आनंतराव कांबळे (वय १८, रा. दत्तनगर ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय दत्तनगर परिसरात राहायला होता. रविवारी सकाळी तो मित्रांसोबत कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. पाण्याच्या प्रवाहात तो वाहत गेला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी पोलिसांना आणि अग्निशमक दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली. काही वेळानंतर जनता वसाहत येथील अग्निशामक केंद्रसमोरील कालव्यानजीक अक्षयचा मृतदेह वाहत जात असल्याचे नागरीकांना दिसून आले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर अक्षयचा मृतदेह कालव्याबाहेर काढण्यात आला, असल्याचे दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सांगितले.