Pune Crime News | गाळ्यांचा ताबा न देता 40 लाखांची फसवणूक, धायरीतील दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खरेदी केलेल्या गाळ्यांचा ताबा मुदतीमध्ये न देता ते गाळे परस्पर भाडे तत्वावर देऊन 40 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी धायरी येथील दोघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते आज रोजी पर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत रोहिदास अशोक रायकर (वय-33 रा. रायकर मळा, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. वैभव बाजीराव रायकर (Vaibhav Bajirao Raikar) व दत्तात्रय रत्नाकर रायकर Dattatray Ratnakar Raikar (रा. जाधवनगर कॉर्नर जवळ, रायकर मळा, धायरी) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित रायकर यांनी 2019 मध्ये दत्तवैभव अॅव्हेन्यू इमारतीमधील गाळा नं. 1 व 2 खरेदी केले होते. त्यासाठी त्यांनी गाळा मालक वैभव व दत्तात्रय रायकर यांना ठरल्याप्रमाणे 40 लाख 50 हजार रुपये दिले होते.
गाळे खरेदी करताना सदरच्या गाळ्यांचा 11 महिन्यात ताबा देण्याचे ठरले होते.
मात्र, आरोपींनी गाळ्यांचा ताबा न देता ते गाळे परस्पर भाडे तत्वार दिले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोहिदास रायकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.
या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर (PSI Nimbalkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हडपसर: ‘तू माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेन,’ अल्पवयीन मुलीला धमकी देऊन विनयभंग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न, नगर जिल्ह्यातील ठेकेदारावर पुण्यात FIR