Pune Crime News | SBI बँकेत नोकरीच्या आमिषाने 6 लाखांना घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एसबीआय बँकेत (SBI Bank) क्लार्क (Clark) पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी उरुळी कांचन (Uruli Kanchan Pune) येथील एका ५२ वर्षाच्या नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहन सुनिल बुळे Rohan Sunil Bulle (वय २५, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) आणि अविनाश रुकारी (रा. मुकुंदनगर, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१७ पासून सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अविनाश रुकारी यांच्या वॉशिंग सेंटर येथे गाडी वॉशिंगसाठी जात असत. रुकारी यांनी त्यांचा चुलत भाचा रोहन बुळे याच्याशी ओळख करुन दिली. रोहन याने फिर्यादी यांना कोल्हापूर येथे त्यांचे आजोबाचे नावाने शिक्षण संस्था काढण्याचे काम चालू आहे. शिक्षण संस्थेमुळे अनेक मोठ्या अधिकार्‍यांशी ओळख आहे. एसबीआय बँकेत क्लार्क या पदावर तुमच्या मुलाला नोकरी लावून देतो, असे सांगितले. रुकारी यांचा भाचा असल्याने फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. सप्टेबर २०२० मध्ये रोहन बुळे याने ६ लाख रुपये दिले तर सहा महिन्यात मुलाच्या हातात अपॉईटमेंटचे लेटर मिळेल, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्याला ६ लाख रुपये दिले. (Pune Crime News)

त्यानंतर त्याला त्यांनी वेळोवेळी काम कधी होईल, याची विचारणा करत.
तो थोडे दिवस थांबा असे सांगत होते. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने तुमचे काम होणार नाही, असे सांगितले.
तेव्हा त्यांनी दिलेले पैसे परत मागितले. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले.
अविनाश रुकारी यांनीही त्याला पैसे परत देण्यास सांगितले.
तरीही त्याने पैसे न दिल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | 6 lakhs cheated with the lure of job in SBI Bank

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा