पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडण आणि खेळण्याच्या कारणावरून 8-10 जणांच्या जमावाने घरात घुसून 54 वर्षीय महिलेचा विनयभंग करत पिडीत महिलेच्या 3 मुलांना मारहाण केल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधित पिडीत महिलेने पोलिस आयुक्तांकडे अर्ज केल्यावर एकुण 13 जणांविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
सलाउद्दीन शेख, शादाब शेख, जैनुद्दन शेख (तिघे रा. कोंढवा) यांच्याविरूध्द विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 4 डिसेंबर 2022 रोजी आरोपी सलाउद्दीन शेख आणि त्याचे इतर 10 साथीदार पिडीतेच्या घरी गेले. त्यांनी मुलांना येथे खेळू नका तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून बेसबॉल, हॉकी व दांडक्याने मारहाण केली. आरोपींनी मुलांना जखमी केले. आरोपींनी पिडीत महिलेच्या फ्लॅटच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेरा फिरवला आणि घराचा दरवाजा वाजवुन ते हातात कोयता, बेसबॉलची बॅट, हॉकिस्टीक अशी हत्यारे घवुन जबरदस्तीने आत गेले. त्यांनी पिडीत महिलेस अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली. कोयत्याने त्यांचा नकाब उचलून त्यांना धमकावले तसेच बेडरूमची पाहणी करून जाताना दमदाटी केली. (Pune Crime News)
गुन्हा घडल्यानंतर पिडीत महिला खुप घाबरल्या असल्याने त्यांनी तात्काळ तक्रार दिली नाही.
मात्र, त्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे तक्रार अर्ज केला.
दिलेल्या अर्जावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A 54-year-old woman was molested by entering the house in Kondhwa, and the victim’s children were brutally beaten
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…
Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’