Pune Crime News | दारु पित बसले असल्याचे म्हटल्याने दारुची बाटली फोडली तरुणाच्या डोक्यात; कोंढव्यातील पुण्यधाम आश्रमजवळील मैदानातील घटना

पुणे : Pune Crime News | मित्राच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर मैदानात दारु पित बसलेले तरुण पाहून येथे सर्व दारु पित बसले आहेत, आपण दुसरीकडे जाऊ, असे तरुणाचा मित्र म्हणाला. मात्र, तेथे बसलेल्या दोघांनी मित्राला सोडून तरुणाच्या डोक्यात दारुची बाटली (Attempt To Murder) फोडून गंभीर जखमी केले. (Pune Crime News)

ही घटना कोंढव्यातील (Kondhwa News) पुण्यधाम आश्रमजवळील स्कोर क्रिकेट ग्राऊंडवर मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडला. याबाबत शंतनु लक्ष्मण नेहरकर (वय २३, रा. सिद्धी गार्डन सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद (गु. रजि. नं. २५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयुर कदम आणि आकाश कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मित्र प्रिंन्स याचा वाढदिवस असल्याने तो मित्राबरोबर
स्कोर क्रिकेट ग्राऊंडवर गेला होता. तेथे त्यांनी केक कापला. त्यानंतर प्रिन्स फिर्यादीला म्हणाला की,
येथे सर्व दारु पित बसले आहेत, आपण दुसरीकडे जाऊ. त्यानंतर ते तेथून जाऊ लागले.
त्यांचे बोलणे ऐकून मयुर कदम व आकाश कदम हे त्यांच्याजवळ आले.
‘‘येथे कोण बेवडे बसलेत, तु कोणाला दारु पित बसले आहेत म्हणतो, तू कुठला भाई आहे’’
असे म्हणून शिवीगाळ करुन त्याच्याकडे असलेली दारुची बाटली शंतनुच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलिसात तक्रार दिली तर दिसलात तेथे मारु, अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A bottle of alcohol was broken on the young man’s head as he said he was drinking; Incident in the field near Punyadham Ashram in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar | मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर…, नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ

Nagpur Crime News | चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या

Pune News | हिमतीने समोर गेल्यास महिला जग जिंकेल; जागतिक महिला दिनी आबेदा इनामदार यांचे प्रतिपादन