Pune Crime News | सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime News | व्याजाने घेतलेले पैसे परत देण्यासाठी होत असलेल्या मानसिक व शारीरीक त्रासाला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

वैभव प्रकाश सूर्यवंशी Vaibhav Prakash Suryavanshi (रा. सहजीवन सोसायटी, पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४६१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुल बाबासाहेब सूर्यवंशी Atul Babasaheb Suryavanshi (वय ३५, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून ३ मार्च २०२३ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती वैभव सूर्यवंशी यांनी आर्थिक अडचणीमुळे
अतुल सूर्यवंशी याच्याकडून ७ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचे वेळोवेळी व्याज ते देत होते.
काही कारणामुळे त्यांना व्याज देता न आल्याने अतुल सूर्यवंशी हा त्यांना वारंवार धमक्या देत होता. मारहाण करुन शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून ३ मार्च रोजी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यावरुन पोलिसांनी आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे़.

Web Title : Pune Crime News | A businessman commits suicide after suffering from a moneylender; FIR in Hadapsar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयाला भेट, राजकीय चर्चेला उधाण; युतीबाबत राजू पाटलांचे सूचक विधान, म्हणाले-‘…तर एकत्र येऊ’

Sangli ACB Trap | 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव