Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून गुंडाचा वडगावमध्ये राडा; केस मागे घेण्यासाठी घराच्या दरवाजावर लाथा मारुन जीव मारण्याची दिली धमकी

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीला (Minor Girl) फुस लावून तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुंडावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली होती. जामिनावर सुटून आल्यानंतर या गुंडाने केस मागे घेण्यासाठी मुलीच्या घराच्या दरवाजावर लाथा मारुन राडा घातला. केस मागे घेतली नाही तर जीवे मारण्याचा धमकी (Threats to Kill) दिली. (Pune Crime News)

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhgad Road Police Station) गुरु संजय ऊर्फ बाळु कांबळे Guru Sanjay alias Balu Kamble (वय २०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वडगावमध्ये राहणार्‍या एका ३९ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या मुलीला गुरु संजय याने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. (Pune Crime News)

दरम्यान, १२ एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुरु संजय हा फिर्यादी यांच्या घरी आला.
दरवाजावर लाथा मारुन जोर जोरात बोलून दार उघड असे म्हणू लागला.
“केस मागे घेतली नाही तुझ्या घरातून तुझ्या मुलीला घेऊन जातो की नाही हे बघ.
तसेही मी जेलमध्ये राहून आलेलो आहे. मला कोणाची भिती नाही. तुम्ही जर केस मागे घेतली नाही.
तर मी तुम्हा दोघींना मारुन टाकील,” अशी धमकी देऊन त्यांना घाबरुन सोडले.
यामुळे फिर्यादी यांची मानसिक स्थिती बिघडवून त्यांनी गुन्हा मागे घ्यावा किंवा खोटी साक्ष द्यावी,
या उद्देशाने तो त्यांच्यावर दबाव आणत होता. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A gangster’s cry in Vadgaon from one-sided love; He threatened to kill himself by kicking the door of the house to withdraw his case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर