Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोंढवा परिसरातील घटना; आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Minor Girl Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार जुलै 2023 मध्ये पीडीत मुलीच्या घरी घडला होता. (Pune Crime News)

याबाबत कोंढवा खुर्द परिसरात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीने शनिवारी (दि.28) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन हौसलाल पांडे Sachin Hauslal Pandey (वय-21 रा. कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 376, पोक्सो कायदा कलम 4,6,8,12) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन पांडे याने पीडित मुलीसोबत ओळख केली. तिच्याकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर तिच्याकडे शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. मात्र, मुलीने त्यास नकार दिला. 10 जुलै रोजी पीडित मुलगी तिच्या घरी एकटी होती. त्यावेळी आरोपी घरी आला. त्याने जबरदस्तीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे (PSI Digole) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole On PM Narendra Modi | मोदींवर नाना पटोलेंचा गंभीर आरोप,
प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे, त्यांच्या मित्रांच्या फायद्यासाठी

Pune Crime News | खुनाच्या प्रयत्नातील दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांकडून अटक

Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, वाचा सविस्तर

Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी हे ‘4’ पदार्थ खाल्यास नाही राहणार Blood Sugar Level ची चिंता, जाणून घ्या