Pune Crime News | ऑनलाइन मोबाईल मागवणाऱ्या ग्राहकांना फरशीचा तुकडा अन् साबणाची वडी, फसवणूक करणाऱ्या नामांकित डिलिव्हरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

खंडणी विरोधी पथक दोनकडून 4 जणांना अटक; साडेचार लाखांचे 19 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सध्या ऑनलाईन शॉपिंगचे Online Shopping) फॅड वाढले आहे. अनेकजण दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. याचाच फायदा भामटे घेत असल्याचे समोर आले आहे. पुणे शहर आणि परिसरात वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमातून मोबाईल फोन मागवणाऱ्या ग्राहकांना मोबाईल फोनच्या (Mobile Phone) बॉक्समध्ये फरशीचा तुकडा आणि साबणाची वडी, बंद असलेले जुने मोबाईल पाठून फसवणूक (Cheating) केल्याचे समोर आले आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या नामांकित डिलिव्हरी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti Extortion Cell) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

मोईन मोहम्मद हलीम सय्यद (वय -30 रा. तळेगाव दाभाडे), आकाश राजकुमार निकम (वय-32 रा. विमाननगर, पुणे), रणजितकुमार राजगीर मंडल (वय-25 रा. महंमदवाडी पुणे), तुकाराम कृष्णा चौगुले (वय-30 रायकरमळा, धायरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्याकडून 4 लाख 51 हजार 43 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे 19 मोबाईल जप्त केले आहेत. (Pune Crime News)

फसवणुकीचे प्रकार पाहता यामध्ये डिलिव्हरी बॉय, कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाने तपास सुरु केला. तपास करत असताना हडपसर येथे ऑनलाइन मोबाईल फोन मागवणाऱ्या ग्राहकांना मोबाईल फोन ऐवजी फरशीचे तुकडे, साबणाच्या वड्या, बंद पडलेले मोबाईल मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मोबाईल शॉपीचे मालक यांनी त्यांचे मोबाईल शॉपी मधून ग्राहकांनी ऑनलाइन मागवलेले 31 मोबाईल फोनचा अपहार करुन 7 लाख 27 हजार 319 रुपयांची फसवणुक केल्याची फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 408, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला होता.

खंडणी विरोधी पथकाकडून समांतर करत असताना पोलीस अंमलदार विनोद साळुंके व अमोल पिलाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नामांकित डिलिव्हरी कंपनीच्या (Delivery Company) चार कर्मचाऱ्याना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. आरोपी डिलिव्हरी कंपनीकडे स्कॅनर, डिलिव्हरी बॉय, चालक म्हणून काम करतात. मोबाईल शॉपीमधुन मोबाईल फोन घेतल्यानंतर परस्पर त्या बॉक्समधून मोबाइल काढून त्यामध्ये फरशीचे तुकडे, साबणाच्या वड्या ग्राहकांना देऊन मोबाईल शॉपी मलकाची व ग्राहकाची फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) व पोलीस अंमलदार विनोद साळुंके, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, राहुल उत्तरकर, चेतन आपटे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदिप शितोळे, आशा कोळेकर, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती