Pune Crime News | प्राध्यापकाचा पुण्यातील तारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोलकाता येथून कामासाठी पुण्यात आलेल्या एका प्राध्यापकाचा शहरातील एका तारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) स्विमिंग पूल मधील जीवरक्षक आणि हॉटेलच्या व्यवस्थापकाविरुद्ध गन्हा दाखल केला आहे. मोहित प्रमोद आगरवाल (वय-35, रा. बी. के. पॉल ॲव्हेन्यू, कोलकाता, पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत अमर संतोष मनका (वय-34, खराडी, नगर रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हॉटेलचे व्यवस्थापक (Pride Hotel Pune), स्विमिंग पूलमधील जीवरक्षक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मोहित आगरवाल हे प्राध्यापक आहेत. ते सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कोलकात्याहून ते पुण्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. एका संस्थेत त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.

आगरवाल हे गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरले होते.
मात्र त्यांचा बुडून मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी स्विमिंग पूल परिसरात जीवरक्षक उपस्थित नव्हते.
आगरवाल पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले.
हॉटेल व्यवस्थापन व जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मोहित आगरवाल यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव नाईक करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! पुण्यात 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन, अल्पवयीन मुलगा ताब्यात

Lok Sabha Election | गरज पडल्यास लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विश्वासू मंत्र्याचा दावा