Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले; ससून रुग्णालयाच्या गेटसमोरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | डोळे तपासणीसाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करत त्याच्याकडील रोकड व सोन्याची अंगठी लुटून (Fraud Case) नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी बीडमधील (Beed) एका ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८२/२३) दिली आहे. हा प्रकार ससून रुग्णालयाच्या गेटबाहेर शुक्रवारी दुपारी २ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना डोळे तपासणी करायची असल्याने ते ससून रुग्णालयात येत
होते. ससून रुग्णालयाच्या गेटबाहेर आले असताना एकाने त्यांना अडविले.
त्यांना पोलिस असल्याचे सागितले.
त्यांची झडती घेऊन त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज फसवणूक (Cheating Case) करुन चोरुन नेला.
पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A senior citizen was robbed by pretending to be a policeman; Incident in front of gate of Sasoon Hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या