Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर 3 आरोपींकडून लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बालसुधारगृहामध्ये अत्यंत गंभीर घटना घडली आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर तीन सराईत गुन्हेगारांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Pune Police) तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 ते 17 नोव्हेंबर दरम्यान जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र येरवडा येथील बॅरक नं. 2 मध्ये घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शंकर उर्फ शंकु अर्जुन जाधव Shankar alias Shanku Arjun Jadhav (वय-18), अमित रामभवन यादव Amit Rambhavan Yadav (वय-18), राज राजेश शर्मा Raj Rajesh Sharma (वय-18) यांच्यावर आयपीसी 307, 377, 323, 506, 34 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलावर तीन साईत गुन्हेगारांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगा हा सांगली जिल्ह्यातील मिरजगाव येथील असून त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. याच बालसुधारगृहातील इतर तीन आरोपींनी या मुलावर लैंगिक अत्याचार केला. (Pune Crime News)

आरोपींनी पीडित मुलाला हाताने मारहाण करुन तोंडात साबण घातले.
तसेच त्याला कपडे धुण्यास सांगून जबरदस्तीने लैंगिक चाळे केले.
अल्पवयीन मुलाने त्याला विरोध केला असता आरोपींनी चादरीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले.
याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ म्हणत वाहनांची तोडफोड करुन पसरवली दहशत, स्वारगेट परिसरातील घटना

ललित पाटील पलायन प्रकरण : ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ