Pune Crime News | कॉलेजसमोर थांबलेल्या तृतीयपंथीयाला बिअरच्या बाटलीने मारहाण, दिघी येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबल्याच्या कारणावरुन तीन ते चार तरुणांनी तृतीयपंथीला बिअरच्या बाटीने मारुन जखमी केले. ही घटना दिघीतील (Dighi) आळंदी रोड (Alandi Road) परिसरातील एम.आय.टी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी (दि.29) रात्री सव्वादहाच्या सुमारस घडली. (Pune Crime News)

याबाबत अक्षय उर्फ जोया हजेरी (वय-23 रा. नाईकनगर, येरवडा) यांनी सोमवारी (दि.30) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. त्यानुसार मोन्या माने (रा. दिघी) व त्याच्या इतर तीन साथीदारांवर 324,323, 504,506, 34 सह
महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तृतीयपंथी आहेत. अक्षय हे त्यांच्या तृतीयपंथी मैत्रिणींसोबत रिक्षाच्या
प्रतिक्षेत थांबले होते. त्यावेळी मोन्या व त्याचे इतर साथीदार तिथे आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाच्या
प्रतीक्षेत थांबल्याच्या कारणावरुन चिडून बिअरच्या बाटलीने अक्षय याच्या डोक्यात मारुन तसेच चाकूने कमरेवर वार
करुन जखमी केले. यावेळी अक्षय याला सोडवण्यासाठी आलेल्या तृतीयपंथी मैत्रिणींनादखील मोन्या आणि त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी सेवानिवृत्त

Devendra Fadnavis On Protest | फडणवीसांचा सक्त इशारा, हिंसेला थारा दिला जाणार नाही, घरे जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ३०७ कलमांतर्गत गुन्हे दाखल होणार