Pune Crime News | युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणत पुण्यातील महिलेला घातला 12 लाखांचा गंडा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | युट्युब चॅनेल सबस्क्राईब (YouTube Channel Subscribe) करा आणि चांगला परतावा मिळवा असे सांगून महिलेची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याची घटना घडली आहे. याबाबत कात्रज परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 16) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी 2557426XXXXX क्रमांक धारक तसेच टेलीग्राम ग्रुप धारक आणि विविध बँक खातेधारक यांच्यावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 8 मार्च 2023 ते 14 मार्च 2023 दरम्यान फिर्यादी यांच्या घरी ऑनलाइन घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामच्या (Telegram) माध्यमातून पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या एका महिलेला अज्ञात व्यक्तीने संपर्क केला. त्यानंतर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क देऊन 12 लाख 5 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. (Pune Crime News)
मात्र, कोणत्याही प्रकारचा परतावा न देता आर्थिक फसवणूक करत ऑनलाइन गंडा घातला.
याप्रकरणी महिलेने तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारक
तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा