Pune Crime News | बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना; आरोपीला अटक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बहिणाला कामावरुन कमी केल्याने व तिच्या शेवटच्या महिन्याचा पगार दिला नसल्याच्या कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.2) रात्री पावणे दहाच्या सुमारास कोंढवा परिसरातील एनआयबीएम (NIBM) समोरील ब्लीच कॅफे येथे घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत सलमान तशरीफ खान Salman Tashrif Khan (वय-25 रा. एआरव्ही बिल्डिंग, उंड्री पिसोळी रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक (Arrest) केली आहे. यावरून साकीब बाणेदार, मजम्मील, मिसबाह बाणेदार (सर्व रा. कोंढवा) व अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 323, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ हसीब खान याच्याकडे साकीब बाणेदार याची बहिण
सॉफ्टवेअर (Software) बनविण्याचे काम करत होती. तिला कामावरुन काढल्याने व तिचा शेवटच्या महिन्याचा पगार
दिला नाही. या कारणावरून साकीब व इतर आरोपींनी ब्लीच कॅफे (Bleach Cafe) येथे आले. फिर्यादी सलमान खान हे
साकीब याच्या बहिणीचा पगार घेऊन त्याठिकाणी आले असता आरोपींनी सलमान याला लाथा बुक्क्यांनी तोंडावर
मारून गंभीर जखमी केले. सलमान याने कोंढवा पोलिसांकडे (Pune Police) तक्रार केल्यानंतर चार जणांवर गुन्हा
दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार