Pune Crime News | तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कपडे घालण्यावरुन तरुणीला हाताने मारहाण करत विनयभंग (Molestation) केला. तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार कर्वेनगर येथे घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Pune Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. हा प्रकार रविवारी (दि.3) रात्री आठच्या सुमारास कर्वेनगर येथील एका गर्ल हॉस्टेलजवळ घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 25 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन नितीन व्यकंटी सुनेपे Nitin Vyakanti Sunepe (वय-29 रा. शिवाजी पुतळा, फुरसुंगी गाव, हडपसर) याच्यावर आयपीसी 354ड, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कर्वेनगर परिसरातील एका गर्ल हॉस्टेलवर (Girl Hostel Karve Nagar)
राहते. तर आरोपी तिचा मित्र आहे. त्याने दुचाकीवरुन तिचा वेळोवेळी पाठलाग केला.
तसेच तिला कपडे घालण्यावरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला.
रविवारी रात्री गर्ल हॉस्टेल जवळ आरोपीने फिर्यादी यांना अडवून कुठे गेली तर तुझ्याकडे बघूनच घेतो असे म्हणत
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली.
पीडित तरुणीने सोमवारी वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”