Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यात 2 वर्षे फरार असलेला आरोपी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई लेकटाऊन येथे केली. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस दोन वर्षापासून त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Pune Crime News)

सोहेल कादर शेख (वय-23 रा. शिवतेजनगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील फरार आरोपींची संख्या वाढल्याने तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांनी दिले होते. तपास पथकाकडून रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी लेकटाऊन येथे आल्याची माहिती पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लेकटाऊ येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक,
गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, गौरव देव, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम