Pune Crime News | पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीचे बेडीसह पलायन, शिरुर पोलीस ठाण्यातील घटना

शिरुर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन बेडीसह पळून (Accused Fled) गेल्याची घटना शुक्रवारी (दि.24) रात्री शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) घडली आहे. पळून गेलेल्या (Pune Crime News) आरोपीवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) विनयभंगाच्या गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.

 

धनराज मधुकर डोंगरे Dhanraj Madhukar Dongre (वय 28, रा. सध्या मलठण फाटा, शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे मुळ रा. चारदरी, ता. धारूर, जि. बीड) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उद्धव कोंडीराम भालेराव (Police Constable Uddhav Kondiram Bhalerao) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 224 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Pune Crime News)

 

शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या (Molestation) गुन्ह्यातील आरोपी धनराज डोंगरे याला अटक (Arrest) करुन शिरुर पोलीस ठाण्यात पोलीस कस्टडीसाठी आणले होते. शिरुर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांचे वाहन आले असता गाडीतून खाली उतरताना आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. आरोपी शासकीय बेडीसह फरार झाला असून त्याचा रात्रभर शोध घेतला असता तो सापडला नाही.

सविस्तर हकीकत अशी की, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी भालेरावर तसेच होमगार्ड पुंडे हे
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे डी.ओ. संतोष शिंदे (Santosh Shinde) यांच्या तोंडी आदेशानुसार पोलीस ठाण्यात दाखल
असलेल्या गुन्ह्यातील आरोपी धनराज डोंगरे याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी (Medical Checkup) घेऊन गेले होते.
वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला शिरुर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी सरकारी वाहनातून शिरुर पोलीस ठाण्यात गेले.

 

पोलिसांची गाडी शिरुर पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर फिर्यादी हे आरोपीला बेडीची एक बाजू उजव्या हातात पकडून त्याला खाली उतरवत होते.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना हिसका मारुन पोलीस अटक वाचवण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून बेडीसह पळून गेला.
पुढील तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक एकनाथ पाटील (PSI Eknath Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Accused flees with handcuffs after slapping the hands of the police, incident in Shirur police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी व्यक्तीमुळे मुंबईचा…’

Majestic Aamdar Niwas | ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन