Pune Crime News | भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या कारखान्याचा चतु:श्रृंगी पोलिसांकडून पर्दाफाश, 650 किलो बनावट भेसळयुक्त तूप जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सण-उत्सवात भेसळयुक्त तूप (Adulterated Ghee) बनवणाऱ्या कारखान्याचा चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पाषाण गावातील (Pashan Gaon) भगवती नगर येथून तब्बल 650 किलो बनावट भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. तसेच तूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. (Pune Crime News)

पुणे शहरातील पाषाण गावातील भगवती नगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बनावट तूप बनविणारा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. PI Balaji Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (वय-38 रा पासोड्या विठोबा मंदिर जवळ, बुधवार पेठ, पुणे) हा बनावट तूप तयार करत असताना आढळून आला. (Pune Crime News)

पत्र्याच्या शेडमध्ये तूपामध्ये खाण्याचे सोयाबीन तेल, डालडा मिक्स करुन बनावट तूप तयार करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन तब्बल 650 किलो बनावट तूप, 135 किलो तेल, 105 किलो डालडा, 54 पत्र्याचे मोकळे डबे, डबे पॅक करण्यासाठी लागणारी मशिन व झाकण असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला पत्रव्यवहार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण

ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस संशयाच्या पिंजऱ्यात; महिला पीएसआयसह 7-8 पोलिस निलंबीत?

ACB Trap News | पतसंस्था मॅनेजरकडून लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात