Pune Crime News | विद्यार्थ्यांना अडवून कोयत्याने मारुन लुटण्याचा प्रयत्न,विश्रामबाग पोलिसांकडून आरोपींना तीन तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | स्पर्धा परिक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यावर बुधवारी (दि.6) पहाटे कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना (Pune Crime News) टिळक रोडवर (Tilak Road) पहाटे दोनच्या सुमारास घडली आहे. गुन्हा घडल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) अवघ्या तीन तासात तिघांना पानमळा परिसरातून अटक (Arrest) केली आहे.

आदित्य उर्फ आदि जीवन गायकवाड Aditya Jeevan Gaikwad (वय-21 रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड), साहिल उर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे Sahil Shankar Waghmare (वय-23 रा. आम्रपाली बुद्धविहारजवळ, पानमळा वसाहत) व अनिकेत उर्फ अॅन्डी संग्राम सरोदे Aniket Sangram Sarode (वय- 23 पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) आरोपींवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

फिर्यादी आणि त्याचे मित्र हे सदाशिव पेठातील एका अभ्यासिकेत एमपीएससी चा अभ्यास (MPSC Study) करतात. ते तिघे बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अभ्यासिकेतून टिळक रोडने घरी जात होते. टिळक रोडवरील शक्ती स्पोर्ट्स दुकानासमोर (Shakti Sports Shop) आल्यानंतर त्यांच्यामागून एका दुचाकीवरुन तिघेजण आले. त्यातील एकाने दुचाकीवरुन खाली उतरुन तिघांना अडवून पैशांची मागणी केली. त्यांच्यात वाद झाल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी याच्यासह दोघांना कोयत्याने मारहाण केली. मात्र तिघांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले.

गुन्ह्याचे गांभीर्य़ ओळखून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींचा शोध घेत असताना विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळाली की, विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला करुन पळून गेलेले आरोपी सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) पानमळा वसाहत येथे आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तात्काळ पानमळा येथे जाऊन आरोपींना अटक केली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन तासात विश्रामबाग पोलिसांनी आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक वर्षाराणी सुतार (PSI Varsharani Sutar) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Praveen Patil),
पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुंवर (ACP Vasant Kunwar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे (Senior PI Vitthal Dabde),
पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड (PI Dada Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नानेकर (API Balkrishna Nanekar), पोलीस अंमलदार हर्षल दुडम,
मयूर भोसले, प्रकाश बोरुटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खरात यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर,
10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी