Pune Crime News | वाद मिटवण्यासाठी बोलावून घेत टोळक्याकडून तरुणावर वार, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुनी भांडणे मिटवून घेण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून घेत सहा जणांच्या टोळक्याने लाकडी बांबूने बेदम मारहाण (Beating) केली. तसेच धारदार हत्याराने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहा जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत मोहम्मद साबीर खान (वय-17 रा. कोंढवा बु.) याने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सैफ (वय-22), फैज (वय-22), पन्ना (वय-20), मोहम्मद (वय-20), इन्नुस (वय-20), काल्या बाबु (वय-20 सर्व रा. स.नं. 42, कोंढवा खुर्द) यांच्यावर आयपीसी 324, 504, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मलिकनगर येथे 20 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी आणि आरोपी सैफ यांच्यामध्ये जुने वाद आहेत.
त्या दोघांमधील वाद मिटवून घेण्यासाठी आरोपींनी मोहम्मद खान याला मलिकनगर येथील चार मिनार हॉटेल जवळ बोलावून घेतले.
मोहम्मद खान वाद मिटवून घेण्यासाठी त्याठिकाणी गेला असता सैफ याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला पाठीमागून पकडले.
त्यानंतर त्याला शिवीगाळ करुन बांबूने बेदम मारहाण केली. तसेच हातातील धारदार शस्ताने खान याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, सराईत गुन्हेगारासह दोघांवर FIR

पुण्यात एसटी बसची दोन कारसह पाच दुचाकींना धडक, 8 वर्षाच्या मुलासह सहा जखमी; बस चालक पोलिसांच्या ताब्यात (Video)

Pune Crime News | हॉटेल शौर्यवाडासह शहरातील विविध भागात घरफोडी; साडेपाच लाखाचा मुद्देमाल चोरीला