पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भांडण सोडवल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने (Koyta) वार करुन जखमी केले. ही घटना भिलारेवाडी (Bhilarewadi) येथील छत्रपती चौकात रविवारी (दि.29) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी (Pune Crime News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ उर्फ रोहन सरवदे (रा. वाघजाई मंदिराजवळ,भिलारेवाडी, पुणे), सोहम धुमाळ (रा. मांगडेवाडी)
यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) आयपीसी 324, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट (Arms Act),
महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी ओंकार चंद्रकांत बनसोडे (वय-18 रा. ओम साई कॉम्प्लेक्स, भिलारवाडी) याने सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी ओंकार याचे मित्र नागेश पोतदार व आरोपींमध्ये भांडण सुरु होते.
हे भांडण सोडवण्यासाठी ओंकारने मध्यस्थी केली. याचा राग आल्याने आरोपींनी ओंकारला हाताने मारहाण केली.
तसेच कोयत्याने त्याच्या हाताच्या पंजावर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | An incident in Pune where a young man was stabbed with a spear out of anger for resolving a quarrel
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक