पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मार्केटयार्ड (Market Yard Police Station) आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत जबरी चोरी व घरफोडी (Burglary) करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने (Pune Police Crime Branch Unit 2) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सचिन गोपी बोकेफोडे (वय-19 रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या (Pune Crime News) आरोपीचे नाव आहे.
पुणे शहरातील शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार, फरार आरोपी व तडीपार गुन्हेगारांवर करावाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले होते. (Pune Crime News) त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते.
त्यावेळी उज्ज्वल मोकाशी (Ujjwal Mokashi) व संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना माहिती मिळाली की,
भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी सचिन बोकेफोडे हा कात्रज येथील मस्तान हॉटेल जवळ थांबला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील एक आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
पुढील तपासासाठी आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Kranti Kumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), वैशाली भोसले (API Vaishali Bhosale),
पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव, निखिल जाधव, मोहसीन शेख, उत्तम तारु,
साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, गजानन सोनुने, समीर पटेल, कादिर शेख, गणेश थोरात, विनोद चव्हाण, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | The crime branch arrested a staunch criminal in the crime of forcible theft and burglary
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update