Pune Crime News | माथाडीच्या नावाने खंडणी मागणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथक दोन कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | माथाडीच्या नावाने कंपनीच्या प्रतिनिधीकडे खंडणी मागणाऱ्या एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti Extortion Cell) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने कंपनीच्या प्रतिनिधीकडे 1 लाख 20 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हा प्रकार 30 ऑगस्ट दुपारी साडेबारा ते शुक्रवार (दि.1 सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच या दरम्यान कल्याणीनगर (Kalyaninagar) येथील कंपनीच्या गेटवर आणि ऑफिसमध्ये घडला होता.

याबाबत राजकुमार चंद्रकांत बिडवाई Rajkumar Chandrakant Bidwai (वय-43 रा. बोपखेल) यांनी खंडणी विरोधी पथक दोनच्या कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पथकाने विकी नारायण औरंगे Vicky Narayan Aurange (वय-31 रा. गांधीनगर, येरवडा) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) आयपीसी 386, 387, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

फिर्यादी यांच्या कंपनीचे कल्याणीनगर येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ऑफीस आहे. या ऑफिसचे काम सुरु असताना आरोपी विकी औरंगे याने माथाडीचे (Mathadi) कोणतेही काम करत नसताना फिर्यादी यांना माथाडीच्या नावाने 1 लाख 20 हजार रुपयांची खंडणी मागणी करुन टेम्पो मधील साहित्य खाली करण्यास अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी यांच्या ऑफिसचे काम बंद पाडुन जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. फिर्यादी यांनी तजजोड करुन 80 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली.

दरम्यान फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक दोनच्या कार्यालयात तक्रार दिली. पथकाने तक्रारीची पडताळणी करुन सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 20 हजार रुपयांची खंडणी मागून तडजोडी अंती 80 हजार रुपये खंडणी स्वीकारताना आरोपी विकी औरंगे याला रंगेहात पकडण्यात आले.

पुणे पोलिसांचे आवाहन

माथाडीच्या नावाखली बेकायदेशीरपणे पैशाची मागणी होत असल्यास व्यावसायिक, कंपनी प्रतिनिधी यांनी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन
पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर
(PI Pratap Mankar), पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav) पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे,
विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, शंकर संपते, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे,
चेतन आपटे, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात तब्बल एक कोटी रुपयांचा 520 किलो गांजा गुन्हे शाखेकडून जप्त, परराज्यातील महिलेसह तिघांना अटक