Pune Crime News | येवलेवाडी येथील रिक्षा स्टँडवर प्रवासी घेण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये वाद ! एकाने दुसर्‍याच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येवलेवाडी येथील रिक्षा स्टँडवर (Yewalewadi Rickshaw Stand) उभे असलेल्या रिक्षाचालकांमध्ये मीटरप्रमाणे प्रवासी घेण्यावरुन दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. तेव्हा एकाने दगड डोक्यात घालून दुसर्‍या रिक्षाचालकाला जबर जखमी केले. (Pune Crime News )

ADV

याबाबत ताहिर युसूफ सय्यद (वय ३०, रा. खडी मशीन चौकाजवळ, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५५/२३) दिली आहे. त्यानुसार समीर शेख (वय २३, रा. रोशन पानसरे हाईट, येवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येवलेवाडी रिक्षा स्टॅडवर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा घेऊन स्टँडवर आले होते. त्यांच्याअगोदर स्टँडवर समीर शेख हे रिक्षासह उभे होते. एक प्रवासी फिर्यादी यांच्या रिक्षाकडे आला. मीटरप्रमाणे कंमाड हॉस्पिटल येथे प्रवासी भाडे आहे,असे सांगितले. ते मीटर प्रमाणे जाण्यास तयार झाले. प्रवाशाला घेऊन जात असताना अगोदर स्टँडवर असलेले समीर शेख यांचा गैरसमज झाला की फिर्यादी येवलेवाडी रिक्षा स्टँड येथील प्रवासी सीट वाहतूक करीत चालला आहे. त्यावरुन त्यांच्यात वाद होऊन तो शिवीगाळ करुन लागला. त्यावेळी फिर्यादीने विचारल्यावर तू आमचे दोघांचे अगोदर आमचे सीट घेऊन का चालला.
असे म्हणून त्याने फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
समीर शेख याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले.
इतर रिक्षाचालकांनी त्यांची भांडणे सोडविली. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार (PSI Birajdar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | तळजाई येथील मयुर आरडे टोळीच्या 11 जणांवर मोक्का कारवाई;
CP रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 39 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई