Pune Police MCOCA Action | तळजाई येथील मयुर आरडे टोळीच्या 11 जणांवर मोक्का कारवाई; CP रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 39 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Police MCOCA Action | तळजाई परिसरात (Taljai Tekdi) दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणार्‍या व नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणार्‍या मयुर आरडे व त्याच्या १० साथीदारांवर (Mayur Arde Gang) पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का (Mokka Action) कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

मयुर रंगनाथ आरडे (Mayur Rangnath Arde) (वय 22, रा. तळजाई वसाहत, पदमावती), ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे Rishikesh Alias Barkya Sanjay Londhe (वय 23), रोहन ऊर्फ गायसोन्या राजू आरडे Rohan Alias Gaisonya Raju Arde (वय 21), आदित्य ऊर्फ सॅन्डी पदमाकर डाकले Aditya Alias Sandy Padmakar Dakle (वय 20, रा. महात्मा सोसायटी, पदमावती), अनिकेत ऊर्फ गुड्डु रवींद्र शिंदे Aniket Alias Guddu Ravindra Shinde (वय 24, रा. महात्मा सोसायटी, पदमावती), वृषभ शंकर कांबळे Vrishabha Shankar Kamble (वय 23, रा. तळजाई वसाहत, पदमावती), जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे Jayesh Alias Jayadya Dutta Dhaware (वय 19, रा. तळजाई वसाहत, पदमावती) तसेच तीन अल्पवयीन अशा 11 जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police MCOCA Action)

मयुर आरडे हा मागील पाच वर्षांपासून गुन्हेगारी कारवाया करीत आहे. त्याने व त्याचे साथीदारांनी प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे़ नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, टोळी सदस्यांकडून गुन्हे घडवून आणणे व दहशत निर्माण करणे, तळजाई वसाहत, खंडाळे चौक, वनशिव वस्ती रोड, सहकारनगर परिसरात टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.

या टोळीवर एकत्ररित्या ३ गुन्ह्यांची नोंद असून स्वतंत्रपणे ४ गुन्हे असे एकूण ७ गुन्हे केल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे सहकारनगर पोलीस ठाण्याचे (Sahakar Nagar Police Station)
वरिष्ठ पोलीस निरीखक सुरेंद्र माळाळे (Sr PI Surendra Malale),
निरीक्षक संदीप देशमाने (PI Sandeep Deshmane), पोलीस अंमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर,
पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil)
यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला. अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil)
यांनी त्याची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली.
पोलीस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik)
यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही 39 वी कारवाई आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News |  दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएसकडे; 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आयुक्तांचे आदेश