Pune Crime News | पत्ता विचारताच कार बाजूला घ्यायला लावून लुटले, पाषाण येथील मध्यरात्रीची घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्ता विचारण्यासाठी कार चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली असता चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.22) मध्यरात्री सव्वादोन च्या सुमारास पाषाण येथील जाधव हाइट्जवळ घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत किरण राज शेखर येतनाळ (वय-32 रा. गोपाळ पट्टी, मांजरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहील सुनिल गोडांबे Sahil Sunil Godambe (वय-21) व योगेश लक्ष्मण जानकर Yogesh Laxman Jankar (वय-27) यांच्यावर आयपीसी 386, 323, 504, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे मध्यरात्रीच्या सुमारास कार घेऊन जात होते. मात्र, त्यांना पत्ता माहित नसल्याने त्यांनी आरोपीला पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगता त्यांच्या गाडीत येऊन बसला. माझा भाऊ येणार आहे, गाडी थोडीशी साईडला थांबव असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी गाडी बाजूला घेतली. काही वेळाने एकजण दुचाकीवरुन आला. त्याने चाकूचा धाक दाखवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत हाताने मारहाण करुन दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने 3300 रुपये घेऊन पळून जाऊ लागले.
त्यावेळी फिर्य़ादी यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमले. आरोपींकडे चाकू पाहुन लोक पळून गेले.
याबाबत फिर्य़ादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

थकीत दंड कमी करण्याची वाहनचालकांना संधी, पुणे वाहतूक पोलिसांकडून ‘जिल्हा हेल्प डेस्क’ सुरु

शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 62 वी स्थानबध्दतेची कारवाई