Pune Crime News | तरुणावर धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; भवानी पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भावासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर दोघांनी धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) रात्री साडे अकराच्या सुमारास भवानी पेठेतील (Bhawani Peth) तरुणाच्या घरासमोर घडला. (Pune Crime News)

याबाबत सैफ मोहम्मद हुसेन मेमन (वय-29 रा. व्यापारी तरुण मंडळा जवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फैजान शान शेख, जीशान शान शेख (दोघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ शाहरुख शेख याचे आरोपींसोबत भांडण झाले होते.
याच भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. रविवारी रात्री फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर थांबले होते.
त्यावेळी आरोपींनी भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.
तसेच त्यांच्याकडील धारदार हत्याराने सैफ मेमन याच्या डोक्यात व पाठीवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गागरे (PSI Gagare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोळा मारुन ओढले मिठीत; तरुणाला अटक

पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार, चार जणांना अटक; सहकारनगर परिसरातील घटना

Police Suspended In Pune | कोथरूड परिसरातील घडलेल्या 4 डिसेंबरच्या ‘त्या’ प्रकरणात वाहतूक पोलीस तडकाफडकी निलंबीत