Pune Crime News | फक्त 100 रूपयांसाठी त्यांनी मनगटापासून कापला पंकजचा ‘हात’

चतुःश्रृंगी पोलिस वेळेवर पोहचले अन् वाचला जीव, दोघांना अटक

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नववर्षाचे स्वागत करण्यात सर्वजण मग्न (Pune New Year) असतानाच नुतन वर्षाच्या पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. फक्त 100 रूपयांसाठी चौघांनी एका विद्यार्थ्याचा डावा हात मनगटापासून कापून टाकला. चतुःश्रृंगी पोलिस (Chaturshringi Police Station) तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने जखमीचा जीव वाचला. दरम्यान, पोलिसांनी हे कृत्य करणार्‍यांपैकी दोघांना अटक केले आहे तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

 

यासंदर्भात आशुतोष अर्जुन माने (24, सध्या रा. दुर्वांकुर 3 पंचवटी, पाषाण. मुळ रा. रेटरे हर्नाक्ष, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पंकज तांबोळी याचा डावा हात मनगटापासून कापला गेला आहे. याप्रकरणी प्रणव काशिनाथ वाघमारे Pranav Kashinath Waghmare (18, रा. शिक्षक कॉलनी, सुस रोड, पाषाण) आणि गौरव गौतम मानवतकर Gaurav Gautam Manavatkar (20, रा. शिवनगर बस स्टॉप जवळ, तोंडेचाळ, सुतारवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. PI Balaji Pandhare) यांनी सांगितले आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे गेल्या 2 महिन्यापासून पाषाण परिसरात रहावयास असुन ते सर्वजण सीडॅक ए.सी.टी.एस. या इन्स्टीटयुटमध्ये डॅक कोर्स करीत आहेत. दि. 31 डिसेंबर 2022 रोजी मेस बंद असल्यामुळे आशुतोष माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी र्हर्षाद हॉटेलमध्ये जेवण केले आणि ते रोडवर बाहेर थांबले. त्यावेळी नुतन वर्षाचे आगमन झाले होते आणि पहाटेचे सव्वा एक वाजले होते. दरम्यान, तेथे मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली.

त्यावेळी पंकजने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले. मोटारसायकलस्वारांनी त्यांच्याकडे पैशासाठी जबरदस्ती केली. त्यास पंकजने तीव्र विरोध केला. मुलांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या मित्रांना फोन लावला आणि थोडयाच वेळात तिथे आणखी दोघेजण आले. चौघांनी एकाने पंकजने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार करण्यास सुरूवात केली. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून खाली पडला. रक्तस्त्राव वेगाने होत असल्याने सर्वजण घाबरून गेले. परिसरातील नागरिक देखील हल्लेखोरांच्या या कृत्यामुळे दहशतीखाली आले.

 

काही क्षणातच घटनास्थळी चतुःश्रुंगी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ पंकजला रिक्षात बसवुन उपचारासाठी
ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये रवाना केले. पोलिसांनी पंकजचे प्राण वाचवले.
पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक (PSI Nileshkumar Mahadik) यांच्या समक्ष आशुतोष अर्जुन माने यांनी
फिर्याद देवून हल्लेखोरांचे वर्णन देखील सांगितले होते. त्यावरून चतुःश्रृंगी पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली.
पोलिसांनी रविवारी दुपारपर्यंत परिसरातून प्रणव वाघमारे आणि गौरव मानवतकर यांना अटक केली होती
तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले होते. चतुःश्रृंगी पोलिस गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Attempt To Kill Murder Chaturshringi Police Station Arrest Two In Half Murder Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा