Pune Crime News | गोमांसाची वाहतूक करणार्‍यांना खडकी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गोमांसाची वाहतूक करणार्‍यांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द खडकी पोलिस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दि. 22 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

सय्यद सोहेब अजीज (37, रा. कोपर खैरनार, बालाजी गार्डनसमोर, वाशी, नवी मुंबई), तन्वीर अहमद कुरेशी (42, रा. कमला रमन नगर, ममता वेल्फेअर सोसायटी, मुंबई) आणि शौकद हमीद कुरेशी (35, रा. रसुलपुरा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता जुन्या मुंबई-पुणे रोडवरील खडकी जकात नाका येथे एका टेम्पोमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक वालकोळी हे स्फाफसह घटनास्थळी दाखल झाले. तेथे फिर्यादी शिवशंकर राजेंद्र स्वामी (27) हे होते. त्यांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍यांविरूध्द तक्रार दिली. पोलिसांनी टेम्पो आणि त्यामधील आरोपी सय्यद सोहेब अजीज आणि तन्वीर अहमद कुरेशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी शौकद हमीद कुरेशी याचे नाव समोर आले. पोलसांनी त्याला देखील अटक केली. न्यायालयात तिघांना हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दि. 22 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (Pune Crime News)

अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode),
वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शारदा वालकोळी (API Sharda Walkoli),
पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magadum),
उपनिरीक्षक संतोष भांडवलकर (PSI Santosh Bhandwalkar), पोलिस नाईक उध्दव कलंदर,
पोलिस अंमलदार सागर जाधव, शिवराज खेड, अहिवळे यांच्या पथकाने ही कारवाई केलीी आहे.
गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शारदा वालकोळी करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Beef transporters arrested by Khadki police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा