Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन: पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पतीने केला खून

पुणे : Pune Crime News | पती पत्नीत घटस्फोटाचे प्रकरण सुरु होते दरम्यान दोघांनी एकत्र येण्याचा विचार केला होता मात्र दोघांमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Murder In Pune)

घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केला, त्यानंतर पती लॉजला कुलूप लावून पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. १५) रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

काजल कृष्णा कदम (वय २७ वर्षे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे (Bharti Vidyapeeth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील (Sr PI Dashrath Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार काजल आणि कृष्णा पती पत्नी होते, ते दोघेही मजूरी चे काम करत होते. शनिवारी दुपारी ते भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवर उतरले होते.

दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते, मात्र दोघांनीही पुन्हा एकत्रित येण्याचा विचार केला आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी लॉजवर आले होते. दरम्यान दोघांनी मद्यपान केले, आणि त्यांच्या मध्ये वाद झाला.
या नंतर पतीने चाकूच्या साह्याने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केला आणि पळून गेला. (Pune Crime News)

काही वेळाने त्याने आपल्या मित्राला खून केल्याची माहिती दिली.
यांनतर मित्राने घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत लॉजचे कुलूप तोडून रुम उघडली असता काजल मृत अवस्थेत आढळून आली.
पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | औंध: दरोड्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू,
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, येऊन पाहतात तर घर भुईसपाट; 5 जणांवर FIR