Pune Crime News | भीमानदीपात्रात आढळले दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह, परिसरात खळबळ

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरुर (Shirur) तालुक्यातील पारगाव (Pargaon) सा.मा. व नागरगाव या गावातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या (Bhima River) पात्रात रविवारी (दि.29) सकाळी दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

भीमानदीपात्रात दोन मृतदेह आढळून आल्याचे नागिरकांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

नदीपात्रात दोन मृतदेह आढळून आल्याचे समजताच पारगाव आणि नागरगाव येथील नागिरकांनी मृतदेह पाहण्यासाठी नदीपात्राच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.
कारण काही महिन्यांपूर्वी याच नदीपात्रात आठ जणांचे मृतदेह आढळून आले होते.
पारगाव-नागरगाव या दोन गावांना व दोन तालुक्यांना जोडणारा भीमानदीवर पूल आहे.
सध्या या पुलाखाली पाणी कमी असून नदीपात्र कोरडे पडू लागले आहे.
त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हत्याराचा धाक दाखवून दुकानदाराला लुटणाऱ्या ‘काऊ’ भाईच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बोपोडी मधील प्रकार

ड्रग रॅकेट प्रकरणात बदनाम ‘ससून’शी नाते सांगायला वाटते लाज; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या दु:खद भावना

अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून तरुणाला 10 मिनिटांत 7 लाखांचा गंडा, पिंपरी चिंचवड मधील घटना

अशिक्षितपणाचा फायदा घेऊन महिलेसोबत धक्कादायक कृत्य, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन…; पुणे जिल्ह्यातील घटना