Pune Crime News | अशिक्षितपणाचा फायदा घेऊन महिलेसोबत धक्कादायक कृत्य, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन…; पुणे जिल्ह्यातील घटना

भोर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन मित्रांच्या साक्षीने आजारी महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले. एवढेच नाहीतर नराधमाने अश्लील व्हिडिओ तयार करुन व्हायरल करण्याची धमकी देऊन जमीन, पैसे हडपले. हा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात फेब्रुवारी 2022 ते आतापर्यंत घडला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात (Pune Police) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

विशाल बाळासाहेब आदमाने (Vishal Balasaheb Adamane), सचिन किसन नावाडकर (Sachin Kisan Navadkar), सुमीत संतोष पायगुडे (Sumit Santosh Paigude) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत पीडित महिलेच्या 73 वर्षाच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना 43 वर्षाची अविवाहित मुलगी असून तिला ‘ब्रेन ट्युमर’चा आजार आहे. तिच्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. दोघी मायलेकी अशिक्षित आहेत. पतीच्या निधनानंतर वारसा हक्काने 47 गुंठे शेतजमीन फिर्यादी यांना मिळाली आहे. त्यावरच दोघींचा उदरनिर्वाह सुरू होता. फिर्यादी यांची गावामध्ये एक मैत्रीण आहे. तिच्याकडे त्यांचे जाणे-येणे असते. दोन वर्षापूर्वी मैत्रीण फिर्यादी यांना सामान खरेदी करण्यासाठी पुण्याला घेऊन गेली.

मैत्रिणीचा मुलगा विशाल तीन मित्रांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी गेला. त्यांनी फिर्यादी यांच्या मुलीला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले. थंड पेय पिल्यानंतर मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर विशाल याने तिच्यावर अत्याचार केले. तर मित्रांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. यानंतर कोठे वाच्चता केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांना सर्व प्रकार समजला. (Pune Crime News)

बदनामीच्या भीतीने आणि घरात कोणी पुरुष नसल्याने त्या दोघींनी याबाबत कोठेही वाच्चता केली नाही.
त्यानंतर विशाल याने वेळोवेळी कोऱ्या कागदावर दोघींच्या सह्या घेतल्या. बँकेत नेऊन स्लीपवर,
चेकवर सह्या घेऊन पैसे काढून घेतले. एकेदिवशी त्यांना गाडीत बसवून एका कार्यालयात घेऊन गेला.
त्याठिकाणी कॅमेऱ्यासमोर फोटो घेतले. दोन दिवसांनी विशाल याने फिर्यादी यांना घर खाली करण्याची धमकी दिली.

विशालच्या धमकीने मायलेकी घाबरल्या. हा प्रकार फिर्यादी यांनी पुण्यातील एका नातेवाईकाला सांगितला.
त्यांनी कागदपत्रे पाहिली असता जमीन व पैसे विशालने हडप केल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर महिलेने राजगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप (PI Annasaheb Gholap) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक फौजदार नितीन खामगळ पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगून तरुणीचा विनयभंग, पुण्यातील प्रकार