Maharashtra Assembly Winter Session | वाघोलीच्या समस्या विधानसभेच्या पायर्‍यांवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Winter Session | शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील (Shirur Haveli Assembly Constituency) वाघोली गावाच्या समस्या आज विधानसभेच्या पायर्‍यांवर मांडल्या गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar), विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वाघोलीच्या समस्यांबाबत फ्लेक्स फडकावत विधानसभेच्या (Maharashtra Assembly Winter Session) पायऱ्यांवर आंदोलन केले.

पुणे – नगर महामार्गावरील (Pune – Nagar Highway) वाघोली गावाची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. पुणे शहराचा जसा विस्तार होऊ लागला तशी वाघोलीमधील लोकसंख्या वाढू लागली. पुण्याहून नगर, औरंगाबादला जाण्यासाठीचा रस्ता याच गावातून जातो. पण येथे अद्याप चांगले रस्ते नाहीत, वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासंतास ताटकळत रहावे लागते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उड्डाण पुलाचे आश्वासन दिले होते. परंतु, ते अद्याप कागदावरच आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार उदयसिंग राजपूतही उपस्थित होते. (Maharashtra Assembly Winter Session)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

प्लॉट देण्याच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक, व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर FIR

काळ्या जादूने स्पर्धा परिक्षेत यश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; पाषाण परिसरातील प्रकार (व्हिडीओ)

तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भवानी पेठेतील घटना

पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, पिंपरी चिंचवडमधील घटना

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा सपासप वार करुन खून, चाकण परिसरातील घटना

वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या शुभम भोसले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA