Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हातगाडी लावण्यावरुन झालेल्या भांडणात तरुणाला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलीस हवालदारांची (Police Constable) कॉलर पकडून तुम्हाला पोलीस असल्याचा माज आला आहे, बघुन घेतो, अशी भर दिवसा पोलीस चौकीसमोरच (Police Chowk) गुंडांनी धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

राकेश शंकर परदेशी, प्रताप परदेशी (वय ३८), युवराज किशोर परदेशी (वय २९), शंकर सुंदरला परदेशी (वय ५२), अशोक सुंदरलाल परदेशी (वय ६५) सोमनाथ अशोक परदेशी (सर्व रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रताप परदेशी आणि सोमनाथ परदेशी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड आहेत.

याबाबत पोलीस हवालदार गंगाधर काळे Police Constable Gangadhar Kale (वय ५०) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraaskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७७/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पोलीस शिपाई आबनावे हे गणेश पेठ पोलीस चौकीसमोर (Ganesh Peth Police Chowk) शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजता उभे होते. यावेळी विशाल कोटकर हे पळत पळत आले. हातगाडी लावण्यावरुन आरोपी त्याला मारहाण (Beating) करत होते. त्यांच्या तावडीतून सुटून तो जीव वाचविण्यासाठी पोलीस चौकीत आला होता. त्याला वाचविण्यासाठी हवालदार काळे हे मध्ये पडले असताना त्यांना व शिपाई आबनावे यांना आरोपींनी धक्का बुक्की केली. तुम्हाला पोलीस असल्याचा माज आला आहे, बघुन घेतो, असे म्हणत हवालदार काळे यांच्या गणवेशाची कॉलर पकडून धमकी दिली.
पोलिसांनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

या प्रकरणात विशाल दत्तोबा कोटकर (वय २९, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी
फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७८/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रताप अशोक परदेशी (वय ३८)
आणि सोमनाथ अशोक परदेशी (रा. रविवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सतरंजीवाला चौकात हातगाडी लावण्यावरुन त्यांच्या मनगटावर लाकडी दांडक्याने मारुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.
त्यांच्या तावडीतून सुटून ते गणेश पेठ पोलीस चौकीत धावत आले होते.
पोलीस उपनिरीक्षक हाळंदे (PSI Halnde) तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

24 September Rashifal : मेष आणि सिंह सह या चार राशीच्या जातकांसाठी दिवस शुभ, मिळतील लाभाच्या अनेक संधी