Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावताना ‘बंटी-बबली’ची 60 वर्षीय महिलेसोबत झटापट, 1.86 लाखाचे दागिने लांबविले

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात भल्या सकाळी मंगळसूत्र हिसकावत असताना झालेल्या झटापटीत जेष्ठ महिला रस्त्यावर कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सोन साखळी चोरट्या बंटी-बबलीने जबरदस्तीने हिसकावून तबल 1 लाख 86 हजार रुपयांचे मंगळसूत्र पळविले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या या लुटमारीच्या घटनांनी पुणेकर दहशतीत वागत आहेत.

याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महिला व तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या धायरी परिसरात राहतात. त्या वारजेत ओळखीच्या राहणाऱ्या एका व्यक्तीकडे मासे आणण्यासाठी सकाळी 7 वाजता घरा बाहेर पडल्या. त्या रिक्षाने धायरी येथून वारजे स्मशानभूमी लगत रस्त्यावर उतरल्या. तेथून त्या पायी चालत जात असताना साधारण साडे सात वाजण्याच्या सुमारास पाठीमागून दुचाकीवर एक महिला व तिचा साथीदार आले. त्यांनी दुचाकी आडवी लावत फिर्यादी यांना अडविले.

अचानक दुचाकी समोर उभा राहिल्याने त्या जागीच थांबल्या. यावेळी दुचाकीवर चालवणाऱ्या
व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 86 हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकवले. या
झटापटीत महिला रस्त्यावर कोसळली. तरीही चोरट्यानी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र
हिसकावून नेले. हे बंटी बबली चांदणी चौकाकडे पसार झाले. यानंतर महिलेने वारजे माळवाडी
पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. या घटनेने मात्र महिला भयभीत झाल्या आहेत. तर
वाढत्या लुटमारीच्या घटनांनी शहरात दहशत माजवली आहे.
अद्याप तरी या बंटी बबलीचा शोध लागलेला नाही.
मात्र वारजे व गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील वर्षापर्यंत मिळत राहील घर बांधण्यासाठी नाममात्र व्याज दरावर अ‍ॅडव्हान्स

Devendra Fadnavis । ‘ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर… – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Terrorist Hafiz Saeed | दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, 20 जण जखमी, पाकिस्तानात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | chain snatching in warje malwadi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update