Pune Crime News | पुण्यातील चित्तरंजन वाटीकेतून दोन चंदनाच्या झाडांची चोरी, एक महिन्यानंतर घटना उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मॉडेल कॉलनी येथील मनपाच्या चित्तरंजन वाटीका उद्यानातून (Chittaranjan Vatika Udyan – PMC) दोन चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी (Sandalwood Thief) चोरून नेली आहेत. ही घटना 22 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एक महिन्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Pune Crime News)

उद्यानाचे सुरक्षा रक्षक शामराव पवार (वय 39, रा. वडगाव खुर्द, पुणे) यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे पुणे महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका उद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 21 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते 22 सप्टेंबर सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी उद्यानातील बांबूच्या बेटा शेजारी असलेली दोन चंदनाच्या झाडाचे 8 हजार रुपये किमतीचे बुंधे कापून चोरून नेले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

शहरात मागील काही महिन्यांपासून चंदनाची झाडे कापून नेण्याचे प्रकार वाढले आहे.
चंदन चोरट्यांकडून शहरातील शासकीय कार्यालये, बंगल्यांच्या आवारातील चंदनाची झाडे कापून नेली आहेत.
मागील पंधरा दिवसांपूर्वी कोथरुडमधील वुडलँट सोसाटीमधून चंदनाचे झाड चोरीला गेले होते.
चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन चंदनाच्या झाडाची चोरी केली होती. तर खडकीतील किर्लोस्कर कंपनीत शिरलेल्या
चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरुन नेली होती. यावेळी सुरक्षा रक्षक आणि चोरटे यांच्यात झटापट झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात सिनेस्टाईल हाणामारी, राजगुरुनगर बसस्थानकातील घटना