Pune Crime News | चंदननगर: कॅबचे नुकसान करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून लुटणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | कॅबला अडवून त्याच्या काचेवर दगड टाकून नुकसान केले. चालकाच्या गळ्याला चाकू लावून खिशातील पैसे लुटणार्‍या दोघांना चंदननगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

कविराज राम बिक (वय ३०, रा. रामवाडी) आणि समीर साहेबलाल शेख (वय २४, रा. माळवाडी, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सचिन अजबराव मेश्राम (वय ३५, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४६/२३) दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील चिंतामणी हॉस्पिटलसमोरील रोडवर बुधवारी पहाटे एक वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे उबेर कंपनीची कॅब घेऊन जात होते.
त्यावेळी आरोपींनी रोडच्या मध्ये येत गाडी अडविली. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन गाडीचे काचेवर दगड मारुन पुढील
काच फोडून नुकसान केले. त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची खंडणी (Extortion Case) मागितली.
फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांच्या गळ्याला चाकू लावून खिशातील दिवसभराच्या धंद्याचे १८००
रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी रस्त्याने जाणारे दत्ता बंडगर हे दुचाकीस्वार त्यांच्या मदतीला धावून आले. चोरट्यांनी त्यांनाही मारहाण (Beating) करुन त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन त्यावरुन पळून गेले होते.
याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक माने (API Mane)
तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | मध्यरात्री 2 वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई ! बारामती अ‍ॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना; दोन बड्या नेत्यांवर आरोप

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…, पुण्यातील मुख्य मिरवणुकीला 10.30 वाजता सुरुवात