Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्‍या उमेदवाराला अटक

पुणे : Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police Force) भरती होण्यासाठी बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन प्रमाणपत्र सादर करुन फसवणुक (Cheating Case) करण्याचा प्रयत्न केलेल्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे.

सचिन भिमराव वाघमोडे Sachin Bhimrao Waghmode (रा. लक्ष्मीटाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर – Solapur) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील (Sub-Inspector of Police Vinayak Dadaspatil) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४७/२३) दिली आहे. हा प्रकार ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक कार्यालयात ८ मे २०२३ पासून आजपर्यंत घडला.

ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी सचिन वाघमोडे याने आरक्षित जागेवर अर्ज केला होता.
त्यासाठी त्याने बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई – PTE) प्रमाणपत्र सादर केले होते.
पोलिसांनी त्याची संबंधित संस्थेकडे पडताळणी केली असता ते प्रमाणपत्र खोटे व बोगस असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांकडून फिर्याद देण्यात आली आहे.

Web Title : Pune Crime News | Chaturshringi Police Station – Candidate who gave fake certificate for police recruitment arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court |  मशिदींवरच्या भोंग्यावरुन हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं, दिले ‘हे’ आदेश

Kalyan Crime News |  इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, गुंगीचे औषध देऊन आर्मी जवानाकडून महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार

Devendra Fadnavis | ‘अंदाज कुछ अलग है मेरा, किसको…’, फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे? (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप