Pune Crime News | शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना हॉटेल-कॅफेमध्ये अश्लील उद्योग करण्यास मुभा देणार्‍या 3 कॅफेचालकांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेल आणि कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा-कॉलेजातील मुला-मुलींना असभ्य आणि अश्लील वर्तन (Obscene Behavior) करण्यास मुभा देणार्‍या 3 कॅफे चालकांविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अजय हनुमंत रासकर Ajay Hanumant Raskar (22, रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विजय उत्तम गाजरे Vijay Uttam Gajare (23, रा. रामलिंग रोड, शिरूर, जि. पुणे) आणि उमेश संजय जाधव Umesh Sanjay Jadhav (22, रा. मार्केटयार्ड समोर शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल तसेच कॅफे चालकांची नावे आहेत. यासंदर्भात शिरूर पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव नगर येथील हक्झोगोन कॅफेचा चालक अजय हनुमंत रासकर,
रेव्हेन्यु कॉलनी येथील युनिक कॅफेचा चालक विजय उत्तम गाजरे आणि शिरूर शहरातील टेल इलेवन कॅफेचा
चालक उमेश संजय जाधव यांनी त्यांच्या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना असभ्य
व अश्लील वर्तन करण्यास मुभा दिली. कॅफे आणि हॉटेलच्या बैठक व्यवस्थेत बदल केला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक नाथा जगताप करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Crime against 3 cafe operators for allowing school-college boys and girls to engage in obscene activities in hotel-cafes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार?, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाची काय असणार रणनिती?; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले…

Malshej Ghat Closed | निसर्गरम्य माळशेज घाट आता दर गुरूवारी बंद, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी ग्रुपचा मोठा निर्णय ! एनडीटीव्ही सुरू करणार विविध भारतीय भाषांमध्ये 9 न्यूज चॅनेल