Pune Crime News | अफिम, गांजाची विक्री करताना गुन्हे शाखेकडून दोघांना अटक; 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अफिम (Opium) व गांजाची (Marijuana) विक्री करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) एका महिलेसह दोघांना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 150 ग्रॅम अफिम व 632 ग्रॅम गांजा असा एकूण 3 लाख 22 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) हडपसर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी (Drug Trafficking) करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णीक (IPS Sandeep Karnik) यांनी दिले होते. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-1 हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत गुरुवारी (दि.21) पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर (Pravin Uttekar)व संदिप शिर्के (Sandeep Shirke) यांना माहिती मिळाली की, मांजरी मुंढवा रोडवरील गवळी वस्ती येथील सार्वजनीक रोडवर एक महिला गांजा विकत आहे. पोलिसांनी छापा टाकून महिलेकडून 12 हजार 650 रुपयांचा 632 ग्रॅम गांजा जप्त केला. तिच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

तसेच शुक्रवारी (दि.21) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार पांडुरंग पवार (Pandurang Pawar) व सचिन माळवे (Sachin Malve) यांना भारती विहार सोसायटीच्या गेट समोरील सार्वजनीक रोडवर एक व्यक्ती अफिम हा अंमली पदार्थ विकत आहे. पोलिसांनी छापा कारवाई करुन बीरमाराम कोजाराम विश्नोई (वय-30 रा. टिळेकर नगर, कोंढवा मुळ रा. विश्नोईयोंकी ढाणी, शोभाला जैतमाल, ता. घोरीमन्ना जि. बाडमेर, राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीचे 150 ग्रॅम अफिम व 10 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe)

यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior PI Vinayak Gaikwad) ,
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी,
प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी,
पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव,
रेहना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | SRA अधिकाऱ्यांना उशिरा पोलीस बंदोबस्त
पुरवण्यासाठी बिल्डरकडे 20 लाखांची मागणी, लाचेची मागणी करणारा
पोलिस शिपाई ‘गोत्यात’