Pune Crime News | डेक्कन: वीज कापण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचार्‍यांवर सोडला कुत्रा; प्रभात रोडवरील अपार्टमेंटमध्ये जिन्यात ठेवले कोंडून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Crime News | प्रभात रोडवर राहणार्‍या एका कुटुंबाचे बिल थकल्याने वीज खंडीत (Power Cut) करणाऱ्यासाठी आलेल्या महिला कर्मचार्‍यांच्या अंगावर कुत्रा सोडला. तसेच त्यांना जिन्यामध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ करुणा विजय आढारी (Karuna Vijay Adhaari) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६४/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ललित बोदे आणि आरती ललित बोदे (रा. सरस्वती अपार्टमेंट, गल्ली नं. ३, प्रभात रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा तीन ते साडेचार दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रोडवरील गल्ली क्रमांक ३ मधील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणारे
बोदे यांचे सुमारे १० हजार रुपयांचे वीज बिल (Electricity Bill) थकलेले होते.
त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी वीज थकबाकी वसुलीसाठी तेथे गेले होते. त्यांनी बील न भरल्याने फ्लॅटचा वीज पुरवठा खंडीत करण्यास त्यांनी सुरुवात केली. तेव्हा पतीपत्नीने त्यांना अर्वाच्य भाषा करुन उद्धटपणे बोलून अंगावर कुत्रे सोडले. जिन्यामध्ये त्यांना डांबून ठेवून सरकारी कर्तव्य पार पाडण्यास अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे (PSI Ganesh More) तपास करीत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | मध्यरात्री 2 वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई ! बारामती अ‍ॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना; दोन बड्या नेत्यांवर आरोप

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…, पुण्यातील मुख्य मिरवणुकीला 10.30 वाजता सुरुवात